न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विषारी दारु मुळे पुण्यासह पिंपरीत १२ जणांचा मृत्यू… चौकशीचे आदेश

पुणे/

विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे. मुख्य आरोपीसह पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाची दखल थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसय यांनी घेतली आहे. हे मृत्यू नसून हत्याच असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय या प्रकरणात कोणतीही हयगय करू नका.. कुणाचाही हात असो तपास कठोर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मागील ४८ तासांत पुणे जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरू आहे. विषारी दारूमुळे हाहाकार माजलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ७ तर पुण्यात ५ जण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्यासाठी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून कठोर कारवाई करण्याचे आदेशच दिले आहेत. हयगय करू नका. एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, असे थेट आदेश त्यांनी दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे