३३ वर्षांचा पेच सुटणार? बाणेर–पाषाण लिंक रोडवर आज निर्णायक बैठक
पुणे/ प्रतिनिधी
पुण्यातील बाणेर–पाषाण लिंक रोड प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. तब्बल ३३ वर्षांपासून भूसंपादनातील २०० मीटर अडथळ्यामुळे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आज महापालिकेत महत्त्वाची बैठक होत आहे. टीडीआर व सीमांकनावर निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


