न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 एप्रिलपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

नाशिक/

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेतील जमावास लागू राहणार नाही. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेले इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सभा किंवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कर्णिक यांनी आदेशात नमूद केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे