न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंध्रप्रदेश अपघातात कर्नाटकातील ८ भाविकांचा मृत्यू

कुर्नूल/ वृत्तसंस्था

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात आज सकाळी भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. कुर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयम मंडलातील चिलकलडोना जवळ बोलेरो गाडी आणि ट्रक यांच्यात जोरात धडक झाली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत.

यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. मृत व्यक्ती कर्नाटकातील यात्रेकरु होते. सर्वजण तिर्थयात्रेसाठी जात होते त्याचवेळी काळाने घाला घातला.

जखमींना उपचारासाठी एमिगनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”
अपघातामधील सर्व मृतक हे कर्नाटकातील चिक्कमगळुरु जिल्ह्यातील यात्रेकरु आहे. ते मंत्रालय श्री राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी जात होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी या अपघातप्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे.
“

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे