न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी नगरपरिषदेमध़ील सफाई कामगारांना वारसाहक्काने नोकरी मिळणार…. माजी मंत्री प्रवीण भोसले यांचे प्रयत्न

सिंधुदुर्ग राजू तावडे

रत्नागिरी नगरपरिषद तसेच उर्वरित महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सफाई कामगारांना वारसाहक्काने नोकरी देण्यात आल्या आहेत त्याच प्रमाणे सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याच्या सुचना उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोंडमिसे यांना दिल्या.
माजी मंत्री श्री प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळावी यासाठी आज मंगळवारी मंत्रालय मुंबई येथे उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी सविस्तर चर्चा केली. आयुक्त तथा संचालक श्री. अभिषेक कृष्णा यांनी दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील मुख्याधिकारी यांना सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत जे आदेश दिले आहेत. याकडे श्री प्रवीण भोसले यांनी मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. त्याची अंमलबजावणी सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबत आदेश दिले. दि. २४ फेब्रुवारी २०२३ च्या आदेशामध्ये मुद्दा क्र. ८.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सफाई कामगारांची पदे व्यपगत होत नाहीत त्यामुळे या सफाई कामगारांना वारसाहक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आयुक्त तथा संचालक यांचे दि. २१ फेब्रुवारी २०२५ चे आदेशानुसार यापूर्वीचे संचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे संभ्रम न ठेवता सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याचा मार्ग मोकळा झाला.
या प्रसंगी माजीमंत्री प्रवीण भोसले त्यांच्यासोबत माजी आमदार श्री. राजन तेली, कणकवलीचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, माजी आमदार श्री. रमेश कदम, कामगार नेते श्री. संतोष पवार, मुख्य संघटक, महाराष्ट्र राज्य, सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांचे वारस गोपाळ नामदेव सावंत, सुनिल नारायण परब, नितिन सदानंद कदम उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे