तेरेकर रापण संघाच्या बोटीला गाबीत समाज महासंघातर्फे २५००० रुपयांचा सहाय्य निधी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
तळाशील मालवण येथील तेरेकर रापण संघाच्या बोटीला व कावणाच्या साहित्याला आग लागून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना अखिल भारतीय गाबीत समाज महासंघातर्फे २५००० रुपयांचा सहाय्य निधी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. परशुराम उपरकर यांनी सुपूर्द केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, हरीशचंद्र खोबरेकर, दिलीप घारे, महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. रतनकुमार झाजम, बाबी जोगी, सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


