न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मोदी सरकारच्या १२ वर्षाच्या गौरवशाली कारकिर्दीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा       

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

    मोदी सरकारचा इतिहास हा हिंदूत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आमचे देवा भाऊचे सरकार कटिबद्ध आहे. मोदी सरकारने या १२ वर्षात विविध क्षेत्रातील जे परिवर्तन झाले यात प्रामुख्याने राम मंदिर आणि ३७० कलम यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख करावा लागेल. लव्ह जिहाद सारख्या विषयावर हिंदूत्ववादी सरकारने वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत नाम. नितेश राणे बोलत होते.

ज्या देशात गर्व से कहो हम हिंदू है हे बोलायची भीती वाटत होती तो २०१४ पुर्वीचा भारत हा तृष्टीकरणाची राजनीती करणारा देश होता. त्या देशात आज जय श्रीराम अभिमानाने उच्चारले जाते. हा बदल २०१४ नंतर हिंदूत्ववादी सरकारमुळे झाला. हिंदूची ‘असुरक्षित ‘ ही भावना नष्ट झाली. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यकर्ता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान झाले आणि देशात आमुलाग्र बदल झाले. “जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ” या मुद्द्यावर हिंदूत्ववादी सरकार स्थापन झाले हे हिंदू म्हणून आपल्या सर्वांच्या लक्षात राहण्यासारखे आहे. असे श्री. राणे म्हणाले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, संदिप साटम , मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मधुकर देसाई, संजय वेंगुर्लेकर , भाई सावंत, संतोष राऊळ, सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्ण परब अल्पसंख्याक मोर्चाचे निसार शेख उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे