न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी बिरोडकर टेंबचे ‘भाऊ’ हरपले!

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    सबनिसवाडा-बिरोडकर टेंब येथील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक तथा बिरोडकर टेंब कला-क्रीडा मंडळाचे सल्लागार गंगाराम उर्फ भाऊ सखाराम बिरोडकर यांचे रविवारी दुपारी १ वाजता वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते आजारी होते. अर्धांगवायूच्या आजाराशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

गंगाराम बिरोडकर हे गोविंद चित्र मंदिर येथे सुरुवातीच्या काळापासून सेवेत कार्यरत होते. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. मनमिळाऊ, प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावामुळे बिरोडकर टेंब परिसरात ते सर्वांचे लाडके ‘भाऊ’ म्हणून परिचित होते.

सामाजिक, सांस्कृतिक तसेच कला-क्रीडा क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता. बिरोडकर टेंब कला-क्रीडा मंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने परिसरातील सामाजिक व कला-क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

ते दै. तरुण भारतचे कर्मचारी वैभव बिरोडकर, रिक्षा व्यावसायिक हेमंत बिरोडकर आणि फोटोग्राफर प्रशांत बिरोडकर यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,भाऊ, सुना, नातवंडे, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. भाऊ बिरोडकर यांच्या निधनाने बिरोडकर टेंब परिसराने एक प्रेमळ, मनमिळाऊ आणि आधारवड व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे