ठाण्यात पाच जणांचा बुडून मृत्यू
ठाणे/ सोनू मोर्ये
ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. मुंबई-नाशिक महामार्गालगत रेतीबंदर परिसरातील खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. तर भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे तानसा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.”


