न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आंबोलीत मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

  ‘पोस्टर ऐवजी, आरोग्य सेवा’ हा संदेश घेऊन आंबोली येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजप नेते विनोद राऊळ यांच्या शुभहस्ते सोमवारी करण्यात आले. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून भाजप सिंधुदुर्ग व शिक्षण प्रसारक मंडळ आंबोली यांच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. परब यांचा उपक्रम सरकारच अंत्योदयाचे धेय्य पुर्ण करणारा आहे असे उद्गार जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी काढले. यावेळी विनोद राऊळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या शिबिरास शेकडोंच्या संख्येने रुग्णांनी सहभागी होत लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘मोफत महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी आंबोली जिल्हा परिषदेत याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ.डी.वाय. पाटील हाॅस्पिटल यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचा विशाल परब यांचा संकल्प या महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून साकार होत आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, १० आरोग्य शिबीर विशाल परब यांच्या संकल्पनेतून विधानसभा मतदारसंघात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ वर्षाचा मुख्यमंत्री अन् पंतप्रधान म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांचा कारकीर्दीचा गौरव करण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ आम्ही राबवत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आम्ही ते राबवले. मात्र, विशाल परब यांनी नावाप्रमाणेच विशाल उपक्रम राबवत सरकारचे अंत्योदयाचे धेय्य पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ तपासणी नसून उपचार देण्याच काम देखील या माध्यमातून होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे कार्य होत असल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून मला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. तसेच भाजपच नेतृत्व करणारा नेता म्हणून महाराष्ट्रात काम करण्याची संधी त्यांना मिळो अशा शुभेच्छा त्यांनी विशाल परब यांना दिल्या.

दरम्यान, भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबविला आहे. आरोग्य सेवेची गरज बघता हा उपक्रम आम्ही राबविला असून आरोग्य दूत म्हणून यापुढेही कार्यरत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड‌. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, शशिकांत गावडे, विद्या चव्हाण, संतोष राऊळ, हितेन नाईक, विनेश तावडे, संतोष पालेकर आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत गावडे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश गुरव तर भारत संतोष पालेकर यांनी मानले.

‌

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे