न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

निपाणीत विना हेल्मेट आणि एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्यांवर कारवाई

बेळगांवी/ गजानन बांदेकर

निपाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार आणि इतर कामानिमित्त आले असताना अचानकच निपाणी शहर, बसवेश्वर पोलिस ठाण्यातर्फे उपनिरीक्षक शिवानंद कार्लोळ यांनी एचएसआरपी नंबरप्लेट नसणाऱ्या, अल्पवयीन दुचाकीस्वार, विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर येथील साखरवाडी परिसरात दिवसभर कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी ‘दंडात्मक कारवाई स्वीकारा, अन्यथा हेल्मेट खरेदी करा, ‘ असा इशारा दिला. पोलिस प्रशासनातर्फे दुचाकीस्वारांना आधुनिक नंबरप्लेट, हेल्मेटसक्ती करुन त्याबाबत वेळोवेळी जनजागृती केली होती. पण, त्याकडे दुचाकीस्वारांनी दुर्लक्ष केल्याने पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पोलिसांनी 39 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे हेल्मेट नसलेल्या दुचाकी जागीच जप्त केल्या”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे