कारंजा त भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर
वाशीम/ वृत्तसंस्था
कारंजा लाड शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. सायकल खेळत असलेल्या ८ वर्षीय खिजर खान शफीक खान या चिमुकल्यावर तब्बल ३ ते ४ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


