न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपालच्या कार्यकारी अभियंतापदी श्री. संदीपकुमार महाले

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल, कुडाळ या कार्यालयाच्या कार्यकारी अभियंतापदी श्री. संदीपकुमार हिरामण महाले हे मंगळवार दिनांक २ जून रोजी हजर झाले असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. कार्यकारी अभियंता श्री. गोविंद श्रीमंगले यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
यापूर्वी श्री. संदीपकुमार महाले हे
कार्यकारी अभियंता व पदसिद्ध अवर सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय येथे कार्यरत होते.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पावर सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणुन त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर पदोन्नतीने ते कार्यकारी अभियंता म्हणून मंत्रालयात कार्यरत होते.
मंगळवारी श्री. महाले यांनी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. महेंद्र डांबरेकर,उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री. आकाश जाधव, सहायक अभियंता श्रेणी १, पाटबंधारे उपविभाग कणकवली, श्री प्रसाद कापडोसकर आरेखक, महेंद्र मस्के, प्रथम लिपिक, राजू डाके, लिपिक टंकलेखक, उमेश रांजणकर सहा. अभियंता श्रेणी 2,
शैलेश परब, कनिष्ठ अभियंता, संदीप यादव, लिपिक, अमृत देसाई. लिपिक महेश आंदूरलेकर, कनिष्ठ अभियंता, सुनील सुपल लिपिक, आकाश चौरपगार, सहा. भांडारपाल व कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे