हुश्श……….’तो’ येताहा….
मुंबई/
केरळमध्ये अखेर मान्सून दाखल झाला आहे. यंदा नेहमीच्या निर्धारित वेळेपेक्षा 3 दिवस उशिराने मान्सून केरळात दाखल झाला आहे. गोवा व दक्षिण कोंकणात सात दिवसांत तर दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात १५ जूननंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढचे २ ते ३ दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी सध्या असंच तापमान कायम असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


