सिंधुदुर्ग वगळता कोंकणात आजही रेड अलर्ट… रायगडमधील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
मुंबई/ वृत्तसंस्था
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.रायगडमध्ये अंबा, पाताळगंगा , पुंडलिका नदींनी इशारा पातळी ओलांडली आहे.तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच विभागांना रेड अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे.


