अदानीसाठी ? सिंधुदुर्गात छुप्या पद्धतीने तास ते दीड तासांचे भारनियमन …
सिंधुदुर्ग / संतोष मुळीक
युद्धामुळे कमी असलेला कोळसा, पाण्याची अनियोजनामुळे कमतरता यांचा विद्युत निर्मितीवर परिणाम होत असून राज्यासह सिंधुदुर्गात छुप्या पद्धतीने २४ तासांत पाच दहा मिनिटांची लाईट ट्रीप करून तास ते दीड तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. या मुळे वाचणारी वीज हि काही उद्योगांना देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
सिंधुदुर्गात सध्या दर तासाला सरासरी पाच ते दहा मिनिटे वीज जात आहे. ऐन महा गर्मीतही भारनियमन करण्यात येत असल्याने आबालवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी नेते “मी मारतो तुम्ही रडल्यासारखे करा ” अशी भूमिका घेत लोकांना मुर्खा बनविण्याचे कामं करीत आहेत.
या भारनियमनमुळे विद्युत मंडळाला फायदा होत असून सामान्य ग्राहकांना एसी, फ्रिज यांचे भरमसाठ भाडे कटआऊट मुळे भरावे लागणार आहे. अदानीच्या साठीही हा आटापिटा चालल्याचे कर्मचाऱ्यांत चर्चा आहे. विद्युत मंडळ अदानी समुहाकडे पुर्णपणे सोपविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.


