खानापूर लोंढा महामार्गावर अपु-या रस्ता कामामुळे युवकाचा बळी
बेळगांव/ प्रतिनिधी
खानापूर–लोंढा महामार्गावरील रस्ता कामामुळे एका तरुणाचा बळी गेला आहे. रस्त्यावर ठेवलेल्या डिव्हायडरमुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली.
वरकड गवळीवाडा (ता. खानापूर) येथील बाबू खरात (24) हा युवक शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन जात होता. खानापूर-रामनगर मार्गावरील लोंढा रेल्वे गेटपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर रस्त्यावर आडवे उभे असलेले डिव्हायडर त्याच्या लक्षात न आल्याने दुचाकीची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि बाबूचा जागीच मृत्यू झाला.
या भागातील चौपदरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत असून, काही ठिकाणी रस्ता अचानक वळवण्यात आला आहे. मात्र, वेगात येणाऱ्या वाहनचालकांना याची कोणतीही पूर्वकल्पना मिळावी यासाठी आवश्यक असलेले सूचना / फलक नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी हा परिसर पूर्णपणे अंधारात असल्याने रस्ता ओळखणे अशक्य होत आहे. गोव्याहून धारवाड कडे जाणारी वाहने धुळीने माखलेला फलक न दिसत असल्याने खानापूर पर्यंत जातात…


