न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महिलांच्या समस्या निवारणासाठी सावंतवाडी नगरपरिषद कटिबद्ध नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले

 

सावंतवाडी/ राजू तावडे

“सावंतवाडीतील महिलांना सुखी आणि समृद्ध करण्याची आमची प्रतिज्ञा आहे. महिलांना कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा कष्ट जाणवले, तर त्यांनी बेधडक नगरपरिषदेत यावे; त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” असे प्रतिपादन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ.श्रद्धा भोसले यांनी केले.
सावंतवाडी उभा बाजार येथील जि. प. शाळा नंबर २ मधील अंगणवाडी क्रमांक १५ च्या वतीने आयोजित अभिनव हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.
यावर्षीचाही हळदीकुंकू सोहळा ‘एक तरी झाड लावा’ या सामाजिक संकल्पनेतून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या की, “तुळस आणि मानवी जीवन यांचे जवळचे नाते आहे. तुळशीमुळे आपल्याला अमूल्य असा प्राणवायू मिळतो. भविष्यात प्राणवायूसाठी मानवाला संघर्ष करावा लागू नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या अंगणात किंवा टेरेसवर तुळशीचे रोप लावले पाहिजे.”
अंगणवाडी क्रमांक १५ च्या वतीने गेल्या १० वर्षांपासून हळदीकुंकवाचे वाण म्हणून ‘प्लास्टिक’ किंवा ‘वस्तू’ ऐवजी तुळशीचे रोप दिले जाते. या उपक्रमाचे नगराध्यक्षांनी कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार यांच्या हस्ते नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका दुलारी रांगणेकर आणि मोहिनी मडगावकर यांचाही सन्मान करण्यात आला. नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा सत्कार त्यांच्या पत्नी सौ. श्रेया आडीवरेकर यांनी स्वीकारला.
यावेळी अंगणवाडी सेविकाअनुराधा पवार, अमिषा सासोलकर (मदतनीस), सरिता भिसे.पालक व शिक्षक: मीना दाभोलकर, नेहा काष्टे, ज्योती कदम, स्वानंदी नेवगी, जानवी गावडे व इतर.चिमुकली मुले: शुभांगी मेस्त्री, गीतांश मुंज, सहावी नेवगी, अथांग मातोंडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा काष्टे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे