न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राज्यातील भीषण पाणीटंचाईवर तातडीने पावले उचलावीत : वीरेंद्र इचलकरंजीकर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

     यावर्षी पावसाचे अल्प प्रमाण आणि त्यामुळे खालावलेला भूगर्भातील पाण्याचा साठा पहाता येत्या काळात राज्यात भीषण पाणीटंचाई येण्याची दाट शक्यता आहे. पाणीटंचाईच्या या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी हिंदू विधीज्ञ परिषदेने अत्यंत अभ्यासपूर्ण उपाययोजना सरकारकडे पाठवून यावर तातडीने आणि कठोर पावले उचलण्याचे आवाहन सरकारकडे केले आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांमध्ये प्राथमिक दुष्काळ घोषित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना निवेदनपर पत्र पाठवले आहे.

राज्यातील अनेक धरणांमध्ये केवळ २० ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील काही मासांत नागरिक, शेतकरी आणि उद्योग यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी स्थिती आहे. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन येत्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी विनाअडचण उपलब्ध व्हावे, तसेच पाण्याचा अपव्यय थांबावा करता सरकारने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी, असे आवाहन अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पत्रात सरकारला केले आहे.

यावर उपाय म्हणून राज्यातील सर्व खासगी आणि व्यावसायिक जलतरण तलाव बंद ठेवावेत. व्यावसायिक कार वॉशिंग सेंटर्समध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे बंद करावा आणि त्या ठिकाणी पूनर्वापरीत पाण्याचा उपयोग बंधनकारक करावा. बांधकाम व्यवसायासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी केवळ सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग बंधनकारक करावा. सर्व शासकीय आणि खासजी इमारती यांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी.

हॉटेल्स, मॉल्स आणि मोठ्या सोसायट्या यांमध्ये पाण्याच्या पुनर्वापराची सक्ती करावी.

बागायती शेती, तसेच पादचारी मार्ग आणि रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा उपयोग करण्यावर मनाई करावी.‘आयपीएल’च्या एका सामन्यासाठी आणि मैदानाची निगा राखण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो. राज्यातील भीषण दुष्काळाचे गांर्भीय लक्षात घेऊन महाराष्ट्रात ‘आय्पीएल’ (इंडियन प्रीमियर लीग) सामन्यांवर तात्काळ बंदी घालवी.पाश्चिमात्त्य पद्धतीच्या शौचालयांमध्ये एका ‘फ्लश’साठी ३ ते ६ लिटर पाणी जाते. हे पाणी वाचण्यासाठी सर्व शासकीय कार्यालये, निवासी संकुले यांमध्ये भारतीय शौचालयांचा उपयोग करण्याचे धोरण निश्चित करावे.

महाराष्ट्रात नियमित सहस्रो दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रियेविना थेट नद्या- नाले यांमध्ये सोडले जाते. हे टाळण्यासाठी राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्र यांमध्ये पाणी पुनर्वापर प्रकल्प उभारावेत आणि ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावेत. या प्रकल्पांत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग शेती आणि सिंचन यांसाठी प्राधान्याने करण्याविषयी कृती योजना तातडीने कार्यान्वित करावी, असे आवाहन अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे