महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर या राज्यातील अग्रगण्य संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर प्रफुल्ल वसंत देसाई
सिंधुदुर्ग / राजू तावडे
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर या राज्यातील अग्रगण्य संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर प्रफुल्ल वसंत देसाई यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर ही उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असून सन २०२७ मध्ये संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त उद्योग-व्यापार विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती करण्यात आल्याने अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आनंद व्यक्त करत त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रफुल्ल देसाई यांच्या नियुक्तीबद्दल कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, माजी उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अॅड. नकुल पार्सेकर, राजन नाईक, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, विशाल कामत, कुणाल वरसकर आणि मिलिंद प्रभू यांनी अभिनंदन केले .


