न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जय ठाकर याची नवोदय विद्यालयासाठी निवड

 

सिंधुदुर्ग |राजू तावडे

जि.प.प्रा.शा. नेमळे क्रमांक १ या शाळेतील होतकरू व बुद्धिमान विद्यार्थी जय परशुराम ठाकर याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे शाळा व गावाचा मान उंचावला आहे.
जयने हे उल्लेखनीय यश शाळेतील शिक्षिका श्रीमती चंद्रकला भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपादन केले. या अभिमानास्पद यशाबद्दल पंचायत समिती सावंतवाडीचे उपसभापती श्री. गौरव मुळीक तसेच माजी शिक्षण  विस्तार अधिकारी श्री. प्रमोद पावसकर यांच्या हस्ते जय ठाकर व भोसले मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, मुख्याध्यापिका श्रीमती गावकर, शाळेतील इतर शिक्षकवृंद तसेच जयचे वडील श्री. परशुराम ठाकर आणि आई श्रीमती प्रांजल ठाकर हे अभिमानाने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे