न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकण मराठी साहित्य परिषदेची सिंधुदुर्ग नाट्य शाखा जाहीर; चार ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

      कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ‘नाट्य शाखा’ स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार ज्येष्ठ व प्रथितयश कलाकारांचा या नाट्य शाखा समितीत समावेश करण्यात आला आहे.

कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध नाटककार श्री. प्रदीप ढवळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नाट्य शाखा समिती जाहीर केली. यामध्ये नाट्य, चित्रपट आणि विविध कलाक्षेत्रांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ कलाकार श्री. अभय खडपकर (कणकवली), अनेक बालनाट्ये व विविध नाटकांतून भूमिका साकारणाऱ्या आणि एकांकिका स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या सौ. वर्षा वैद्य (कुडाळ), नाट्य दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार श्री. संजय शिंदे (मालवण), १७५ वर्षांची समृद्ध परंपरा असलेली संगीत नाट्यकला निष्ठेने जोपासणारे अभिनेते व दिग्दर्शक. श्री. बाळ पुराणिक (सावंतवाडी) यांचा समावेश आहे.

या निवडीबाबत बोलताना श्री. प्रदीप ढवळ म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांचे नाट्य क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद आहे. या सर्व कलाकारांच्या भावी नाट्यविषयक कार्यात कोमसाप पूर्ण ताकदीने आणि सर्व प्रकारे सहकार्य करेल.”

जिल्हा कार्यकारिणीच्या या बैठकीस कोमसाप जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश मस्के, जिल्हा कार्यवाह ॲड. श्री. संतोष सावंत, श्री. रुजारिओ पिंटो, खजिनदार श्री. अनंत वैद्य, श्री. अभिमन्यू लोंढे, श्री. सुरेश पवार, श्री. संतोष वालावलकर, दिपाली काजरेकर, वृंदा कांबळी आणि श्री. संदीप वालावलकर उपस्थित होते.

यावेळी नाट्य शाखेच्या समितीवर निवड झाल्याबद्दल सौ. वर्षा वैद्य व श्री. बाळ पुराणिक यांचा उपस्थितांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे