न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मळेवाड येथे १ मे रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

‌महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि सिंधुदुर्ग निर्मिती दिनाचे औचित्य साधून मळेवाड येथील श्री कुलदेवता युवक कला क्रीडा मंडळ, मळेवाडकडून १ मे रोजी भव्य खुली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ५००० व सन्मानचिन्ह, द्वितीय रु. ३००० व सन्मानचिन्ह, तृतीय रु. २००० व सन्मानचिन्ह व रु. १००० व सन्मानचिन्ह अशी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सगुण जाधव – ७०६६४०९९९५, सुरज मुळीक – ९६१९७०४५०५, भालचंद्र नाईक – ८३९०७४६५८८ प्रवीण मुळीक ९५११९५६४४३ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे