खेड शहरात पाणी यायला सुरुवात… रायगडात सुकेळीत महामार्गावर पाणी…मार्ग बंद
रत्नागिरी , रायगड / प्रतिनिधी
कोंकणात पावसाचे धुमशान सुरूच असून खेड शहरात जगबुडी चे पाणी यायला सुरुवात झाली आहे . त्यामुळे धोक्याचे इशारे देण्यात आले आहेत. तर. चिपळूणात सीसीटीव्हीतून लक्ष ठेवण्यात आला आहे . वाशिष्ठी अजून इशारा पातळीवर नसल्याने तुर्तास चिपळूणरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे . तर मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळीत पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात गाड्या अडकून पडल्या आहेत . नागोठणे पाली मार्गही बंद आहे.


