न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान तर्फे गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना आज छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून सावंतवाडी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या वितरित करण्यात येतात. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

यावर्षी कोलगाव केंद्र शाळा नं. १, ओटवणे केंद्र शाळा नं. १, सावंतवाडी शहर शाळा नं. ४, दाणोली बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय, ओटवणे रवळनाथ माध्यमिक विद्यालय, मळगाव इंग्लिश स्कूल, माजगाव भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, सावंतवाडी वि. स. खांडेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या छत्र्या वितरित करण्यात आल्या. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या सर्वांनी सिंधू मित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे