पुण्यातील खराडीत आर्थिक वादातुन मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करण्यात आले
पुणे/
आर्थिक वादातुन मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करण्यात आले
खडी क्रशर प्लॅन्टसाठी जागा दाखविण्याची बतावणी करत ठेकेदाराचे अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागण्यात आलीय
खराडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. या प्रकरणात अटक केलेले आरोपी खडी क्रशर (स्टोन क्रशर) चालक आहेत.
सागर दत्तात्रय झुरुंगे (वय ३९), विजय सुरेश वाळुंज (वय ३८), राजू विजयकुमार सहाणे (वय ३२), रूपेश शिवाजी गावडे (वय ३८, सर्व रा. लोणीकंद, पुणे-अहिल्यानगर रस्ता), प्रकाश बाळासाहेब राऊत (वय ३४, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मेट्रोतील ठेकेदाराने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.”


