न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

उच्च न्यायालयाच्या वकिलाची निर्घृण हत्या… छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)/

छत्रपती संभाजीनगर ​शहरातील बीड बायपास रोडवरील गांधेली फाट्याजवळ बुधवारी रात्री उशिरा उच्च न्यायालयाचे वकील मिथून भास्कर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. प्राथमिक पाहणीत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. लूटमारीच्या उद्देशाने मिथून यांची हत्या करण्यात आली असावी, असा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वकिलाच्या हत्येने संभाजीनगरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकऱणाचा कसून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.
मिथुन भास्कर वय ४९, रा. आनंद नगर असे मयत वकिलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली. गंभीर जखमी भास्कर यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. फॉरेन्सिक टीमला भास्कर यांच्या दुचाकीवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या हातांचे ठसे मिळाले आहेत.​ भास्कर यांची दुचाकी आणि त्यातील साहित्य सुरक्षित असल्याने ही घटना केवळ लूटमारीच्या उद्देशाने घडली की यामागे काही नियोजित कट होता, याचा तपास पोलीस करत आहेत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे