न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे स्वच्छ दूतांसाठीचे आरोग्य शिबिर संपन्न.

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडी शहर व हॉस्पिटल स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता दूतांसाठी सोमवारी आरोग्य शिबिर, शिधावाटप तसेच २५ दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी स्वच्छता दूत, गावातील कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुले मिळून १४५ जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला डॉ.उमेश मसुरकर, निसर्गप्रेमी प्रसाद गावडे (रानमाणूस), आपला दवाखान्याच्या डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक फिजिशियन डॉ. विशाल रेड्डी उपस्थिती होते.
संस्थे कडून डॉ. उमेश मसुरकर, प्रसाद गावडे, डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ नागरिक, डॉ. विशाल रेड्डी, साजिया पडवेकर, दीपक म्हापसेकर, विदिशा सावंत, द्रोपती राऊळ, मंगेश सावंत, महेश परुळेकर व रील स्टार जपा यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ.हर्ष ईश्वरा सागावकर व त्यांच्या टीमने ९५ स्वच्छता दुतांची मोफत आरोग्य तपासणी करून डॉ.सागावकर यांनी स्वखर्चाने त्यांना इंजेक्शन व औषधे दिली. तसेच जनलोक मेडिकलचे मालक महेश परुळेकर यांनी हि विना मूल्य औषध पुरवली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे म्हणाले की आमची टीम २४ तास लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत असते. निराधार व गोरगरिबांची सेवा करण्याची संधी हे आम्ही आमचे भाग्य समजतो. याही पुढे ही आम्ही सेवा अविरत सुरू राहणार आहे.
संस्थेचे सल्लागार व उद्योजक शैलेश पै म्हणाले, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे शहरात माणुसकी जपण्याचे काम करत आहे. अपघात होऊन रस्त्यावर पडलेला अपघात ग्रस्त, रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली निराधार व्यक्ती यांना हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचवून त्यांचे जीव वाचवण्याचे बहुमूल्य काम ते करत आहेत. अहो रात्र जीवाची परवा न करता संकटात धावण्याचे महान कार्य सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, समीरा खलील, हेलन निबरे करत असतात. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या स्वच्छता दूतांचे हि आरोग्य चांगले राहिले पाहिजे, याकरिता त्यांच्या हि आरोग्याची काळजी घेण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान त्यांच्या पाठीशी उभी राहीली आहे. या दूतांना कुठच्याही प्रकारची गरज भासल्या त्यांनी थेट सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा व दरवर्षी अशाच प्रकारे कार्यक्रम घेतला जाईल अशी ग्वाही श्री शैलेश पै यांनी दिली.
निसर्गप्रेमी प्रसाद गावडे राणमाणूस, डॉक्टर हर्ष ईश्वरा सागावकर, डॉ.रेड्डी, डॉ. उमेश मसुरकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

स्वच्छता दूतांचे युनियन लीडर बाबू बरागडे म्हणाले की आज पर्यंत आमच्यासाठी कोणीही काही केलं नाही एवढं काम या संस्थेचे सल्लागार शैलेशजी पै. आणि सामाजिक बांधिलकीच्या सर्व सदस्यांना केले आहे आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी असतात याचा आम्हाला अभिमान वाटतो.
या कार्यक्रमाला प्रा. सुभाष गोवेकर, रूपाली पाटील, सामाजिक बांधणी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर, समीरा खलील, अशोक पेडणेकर, सुजय सावंत, लक्ष्मण कदम, हेलन निबरे, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, शेखर सुभेदार, हॉस्पिटल आरोग्य व नगरपरिषद स्वच्छता दूत तसेच ज्येष्ठ नागरिक यांची मोठी उपस्थिती लाभली. संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी आभार मानले.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे