न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन; मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

  सावंतवाडी शहर व परिसरात बेकायदेशीर गोवा बनावटी दारूची विक्री, मटका, जुगार आणि अंमली पदार्थांचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यावर तात्काळ कारवाई करून हे धंदे बंद करावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.

आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून बनावटी दारू, मटका आणि इतर अनैतिक व्यवसाय उघडपणे सुरू आहेत. यामुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः काही ठिकाणी धाडी टाकून हे व्यवसाय उघडकीस आणले होते. त्यानंतर काही काळ या प्रकारांना आळा बसला होता; मात्र आता पुन्हा गैरधंदे करणाऱ्यांनी डोके वर काढले आहे. अनेक वेळा तक्रार करूनही पोलीस खात्याकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पोलीस अधूनमधून कारवाई करतात, मात्र ती केवळ ‘वरवरची’ असते. यामुळे या अवैध धंद्यांचे मुख्य सूत्रधार मात्र मोकाट फिरत आहेत. तसेच, शहरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या आणि काळ्या काचा असलेल्या गाड्यांमधून गैरधंदे सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

मनसेने पोलीस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या ८ दिवसांत सावंतवाडी शहर व तालुक्यातील बनावटी दारू, मटका, जुगार आणि अमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करावी आणि मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा मनसे मात्र तीव्र आंदोलन केले जाईल.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी तालुका मनसे अध्यक्ष मिलिंद सावंत, सावंतवाडी शहराध्यक्ष राजू कासकर, तालुका सचिव सतीश आकेरकर उपस्थित होते.

2/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे