प्रतिक बोवलेकरची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
नुकतीच गोवा येथे वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिवडमन तसेच मध्यप्रदेश या राज्यांमधील नेमबाजांनी सहभाग घेतला होता.यामध्ये कु. प्रतिक सुभाष बोवलेकर (वेंगुर्ला) याने 50 मीटर 0.22 प्रोन जुनिअर मेन प्रकारात 600 पैकी 561 गुणांची नोंद करून उत्कृष्ट कामगिरी केली. त्याची डिसेंबर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत प्रतिकने चमकदार कामगिरी करून याच क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकवीला होता.
त्यांला उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर, रत्नागिरीचे प्रशिक्षक श्री. पुष्कराज इंगोले तसेच अँड.श्री विक्रम भांगले यांचे प्रशिक्षण व मौलिक मार्गदर्शन लाभले.सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रतिकचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


