भाजपा सिंधुदुर्ग कार्यकारिणी बैठकीला सुरवात
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात अतिशय उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले.

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश सागर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, आमदार प्रमोद जठार आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी वरिष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले यांनीही या बैठकीला हजेरी लावली. स्थानिक नेतृत्वामध्ये नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग,जि.सदस्य संदीप गावडे, युवा नेते विशाल परब, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आणि तालुका मंडल अध्यक्ष मधुकर देसाई व संतोष राऊळ यांचा समावश होता.”


