न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विकसित महाराष्ट्रासह भारतासाठी तळागाळापर्यंत पोहचून योजानंची माहिती द्या… रविंद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना सूचना

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवण्यासाठी आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून लोकहिताच्या योजना पोहचविणे गरजेचे असून हे काम फक्त कार्यकर्ताच करू शकतो . त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मोठ्या उत्साहात तळागाळापर्यंत पोहचा असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज सावंतवाडीत केले.

आपल्या भाषणात भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केंद्रात केवळ सत्ता असणे पुरेसे नाही, तर केंद्र व राज्य सरकारच्या योजना आणि विकासाचा लाभ गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्यासाठी पंचायत पातळीवर सक्षम संघटन आणि सक्षम लोकप्रतिनिधींची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर कार्यरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात लोडशेडिंग बंद करण्यात आले असून, ‘हर घर जल’ योजनेद्वारे घराघरांत पाणी पोहोचविण्यात आले आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा वापर वाढविणे तसेच ई-२० सारख्या क्रांतिकारी संकल्पना राबविण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. विकासाची ही प्रक्रिया केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.

‘पार्लमेंट ते पंचायत’ विजयाचा संकल्प

भाजप हा राष्ट्रहितासाठी झटणारा पक्ष असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सरकारच्या कामाची आणि योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले. पक्षाने ‘पार्लमेंट ते पंचायत’ अशा सर्व स्तरांवर विजय मिळवला असून, आता या संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून विकासाचा संदेश प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी सांगितले.

टीआरपी आणि फेक नरेटिव्हवरून विरोधकांवर टीका

भाजप हा राष्ट्रहितासाठी जोपासणारा पक्ष असून, विरोधक केवळ टीआरपी आणि फेक नरेटिव्हच्या लढाईत अडकले असल्याची टीका रवींद्र चव्हाण यांनी केली. भाजपची लढाई मात्र केवळ राजकीय सत्तेसाठी नसून २०४७ च्या विकसित भारतासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील नागरिकांना मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद साधावा आणि सरकारच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, याची माहिती घ्यावी, असा संदेशही त्यांनी दिला.

भाजपची देशासाठी काय गरज आहे, हे तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे, असे सांगत रवींद्र चव्हाण यांनी संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे