न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी रुग्णालयाची पुढील सुनावणी 19 आँक्टोबरला

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील ट्रामा केअर युनिट, सी आर्म मशीन, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदाबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या हमी पत्रासंदर्भात सुनावणीसाठी पुढील तारीख 19आँक्टोबर देण्यात आली.
न्यायमूतीँ शमिँला देशमुख, न्यायमूर्ती निरज धोते यांच्या कोल्हापूर सकिँट बेंच समोर आज अभिनव फाऊंडेशनची जनहित याचिका सुनावणीस होती. अभिनव फाऊंडेशन च्यावतीने वकिल महेश राऊळ, अँड.निरज लवटे हजर होते. जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी अमित आवळे, अभिनव फाऊंडेशन तफेँ सामाजिक बांधिलकीचे लक्ष्मण कदम, मिलिंद म्हापसेकर(कोलगाव) आदी सुनावणीस हजर होते.
सुनावणीस आरोग्य संचालक यांना व्हिसी व्दारे हजर राहाण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. अभिनव तफेँ वकिल राऊळ यांनी आज न्यायालयात वेळे अभावी सुनावणी होऊ न शकल्याने विनंती केली.
दरम्यान आरोग्य विभागाला पुढील तारखेस आरोग्य संचालक यांनी चार आठवड्यात ट्रामा केअर युनिटची मशिनरी देण्याचे, रिक्त पदे आणि सी आर्म मशिनरी संदर्भात दिलेल्या हमीपत्राच्या अनुशंगाने झालेल्या कार्यवाही बाबत माहिती द्यावी लागणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे