न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विशेष लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी ४६ प्रकरणे निकाली

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर 

 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशांनुसार प्रमुख ज‍िल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष, ज‍िल्हा व‍िधी सेवा प्राध‍िकरण, स‍िंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स‍िंधुदुर्ग ज‍िल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे प्रलंबित प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या लोक अदालतीसाठी ज‍िल्हा न्यायालयात एक पॅनेल व सर्व तालुका न्यायालयात एकूण सात पॅनेल करण्यात आले होते. जिल्हा न्यायालयातील पॅनेल मध्ये श्रीमती एस. जे. पाटील, २रे सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग व विधीज्ञ प्रसाद सावंत यांनी काम पाहिले.ए. जी. देशिंगकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग विशेष लोक अदालतीसाठी उपस्थित होते.

विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकार व विधीज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील विशेष लोक अदालतीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग घेतला होता.

सदर लोक अदालतीमध्ये सिंधुदुर्ग ज‍िल्ह्यात एकूण ४६ प्रकरणे तडजोडीने न‍िकाली झाली. सदर प्रकरणांमध्ये एकूण ५१,१५,८७०/- इतक्या रकमेची तडजोड झाली. विशेष लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांचेतील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच सदर तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे