न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग तर्फे जिल्ह्यातील १७ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळ व कोमसाप शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे रविवार दिनांक ८ मार्च रोजी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील १७ कर्तृत्ववान महिलांचा गुलाबपुष्प, शाल, सन्मानचिन्ह, वृक्ष आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मंगेश मसके, उद्घाटक साप्ताहिक व्याघचया संपादक तथा साहित्यिका संजीवनी देसाई, प्रमुख अतिथी जिल्हा बँक संचालिका नीता राणे, साहित्यिक वृंदा कांबळी, ग्रंथमित्र प्रा.अनंत वैद्य, कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, कार्य.सदस्य संदीप वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत म्हणण्यात आले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या उद्घाटक संजीवनी देसाई यांचा सन्मान नीता राणे यांच्या हस्ते आणि नीता राणे यांचा सन्मान संजीवनी देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली अशा १७ महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ महिला रुग्णालयाच्या डॉ.गायत्री पालयेकर, वर्षा वैद्य, १०० हून जास्त गड किल्ले सर केलेली सौ. नुपूर मठकर, पत्रकार अनुजा कुडतरकर, स्वाती वालावलकर, रिया शिवगण, साधना माडये, प्रतीक्षा बागायतकर, प्रिया राजन पांचाळ, पल्लवी पंढरीनाथ सावंत, सरिता बबलू पिंगुळकर, प्रणया प्रवीण धुरी, मनीषा धोंडी मसके, साक्षी भालचंद्र धुरी, साक्षी रविकिरण कविटकर आदी सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नीता राणे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून बचतगटांसाठी दिली जाणारी कर्ज, योजना आदींबाबत माहिती देत मधुभाईंसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. उद्घाटक संजीवनी देसाई यांनी स्त्रियांना उत्तम असे मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री. मंगेश मसके यांनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या संस्थेच्या सूचनांची अंमलबजावणी करताना अल्पावधीत कुडाळ शाखेने केलेल्या आयोजनासाठी सुरेश पवार, संतोष वालावलकर, गोविंद पवार आदींचे कौतुक केले. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी मानले तर सूत्रसंचालन राहुल कदम यांने केले.
यावेळी विठ्ठल कदम, श्री. भरत गावडे, श्री.मर्गज, श्रीम.पाताडे, सौ. मसके, कुमारी मसके, प्रदीप केळुसकर, कुडाळ शाखेचे सदस्य उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे