न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

ऐतिहासिक ‘हुडोत्सवात’ भाजपा युवा नेते विशाल परब यांची उपस्थित

सिंधुदुर्ग /राजू तावडे

सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील द ऐतिहासिक प्रसिद्ध श्री देवी भावई हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या प्रसंगी भाजपाचे युवा नेते श्री. विशाल परब उपस्थित होते. त्यांनी श्री देवी भावईचे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना शिमगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
कोकणातील शिमगोत्सवाला विशेष महत्त्व असून, होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हा हुडोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक आणि मुंबईतील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शंभर फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने भाविकांनी केलेली दगडफेक. ‘भल्ली-भल्ली भावयच्या’ जयघोषात हजारो भाविकांनी या थरारक सोहळ्याचा अनुभव घेतला.
या उत्सवात रोंबाट, वाघ शिकार आणि घोडेमोडणी हे विशेष आकर्षण ठरले. वाघ खेळाची परंपरा जपण्यासाठी कुणकेरकर कुटुंबातील सदस्य थेट लंडनहून गावात दाखल झाले होते. तसेच पारंपरिक पाथर धनगरणीचा दगड उचलण्याचे खेळही उत्साहात पार पडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे