न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मच्छी मार्केटची दुरावस्था, नगरसेवक देव्या सुर्याजीनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी मच्छी मार्केटची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून अस्वच्छता आणि पाणीटंचाईमुळे विक्रेत्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत लक्ष वेधून २ आठवडे होऊन देखील कार्यवाही न झाल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना आज धारेवर धरले. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणार कधी? असा सवाल त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला. येत्या मंगळवारी बांधकाम व आरोग्य विभाग अधिकारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी नगर परिषदेचे गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर उपस्थित होते.
मच्छी मार्केटमध्ये न.प. कर्मचारी घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. याप्रश्नी नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधल होत. ‌यावेळी श्री. सुर्याजी म्हणाले, मच्छी मार्केट हे शहराच्या मध्यवर्ती आणि रहदारीच्या ठिकाणी आहे. बाजूलाच शाळा आणि रहिवासी वस्ती असल्याने येथील दुर्गंधीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मार्केटमधील अंतर्गत भागात असलेले बंदिस्त फ्रीज हटवून ती जागा मोकळी करावी तसेच विक्रेत्यांनी केवळ ठरवून दिलेल्या ओट्यांवरच बसावे, खाली बसण्यास बंदी घालावी. मार्केटमधील तुटलेल्या फरश्या, गटारे आणि खिडक्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून नवीन बांधकाम करावे. फरशीवर सतत पाणी असल्याने सफाई कर्मचारी व नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी तिथे ‘मॅटिंग’ घालून पाण्याचे योग्य नियोजन करावे. सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने मार्केटसाठी त्वरित स्वतंत्र विहीर उपलब्ध करून द्यावी.होलसेल विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर पाणी सोडू नये. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करून सांडपाणी थेट गटारात जाईल, अशी व्यवस्था करावी.
दर्पण रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावेत. मार्केट परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने हटवण्यात यावीत. नगरपरिषद अधिकारी वर्गाला मच्छी विक्रेते जुमानत नाहीत त्यामुळे शिस्त हा प्रकार दिसत नाही. असे मत श्री. सुर्याजी यांनी व्यक्त केले. उद्या मंगळवारी तातडीची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अस आश्वासन मुख्याधिकारी श्री. औंधकर यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे