न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम साजरा

सिंधुदुर्गनगरी/ देवयानी वरसकर 

 महाराष्ट्र राज्‍य विधी सेवा प्राध‍िकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सिंधुदुर्ग डॉ.सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने दिनांक१०.०७.२०२६रोजी न्यू इंग्लिश स्कूल ओरोस येथे जागतिक लोकसंख्या दिन या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.

सदर कार्यक्रमास मा.श्री.आर.व्ही.नडगदल्ली,सहदिवाणीन्यायाधीश(व.स्तर)वअति.मुख्यन्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग, श्री.अवधूत मालणकर, संस्था अध्यक्ष, श्री.मनिष पारकर,शालेय समिती अध्यक्ष,श्री.एस.एम.राणे,मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच श्री.मिलिंद रासम,लिपिक,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ए.पी.गिते सहाय्यक शिक्षक तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एस.एम.राणे मुख्याध्यापक यांनी केले.मा.श्री.आर.व्ही.नडगदल्ली,सहदिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अति.मुख्यन्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विद्यार्थ्यांना जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो.या दिवसाचा उद्देश वाढती लोकसंख्या,आरोग्य,शिक्षण,कुटुंबनियोजन,लैंगिकसमानता आणि शाश्वत विकास याबाबत जनजागृती करणे हा आहे.सन१९८९मध्ये United Nations Development Programme (UNDP) ने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात केली. यामागील प्रेरणा ११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५ अब्ज झाल्याच्या टप्प्यामुळे मिळाली.तसेच लोकसंख्या वाढीचे सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम समजून घेणे, कुटुंबनियोजन आणि मातृ-बाल आरोग्याबाबत जनजागृती करणे, महिलांचे सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे असे सांगितले. विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी केवळ शिक्षण घेण्यापुरती मर्यादित नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक उत्तरदायित्व आणि जनजागृती यांद्वारे आपण समाजात सकारात्मकबदल घडवू शकतो.आजचा दिवस आपल्याला हेच स्मरण करून देतो की,विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सुशिक्षित,निरोगी आणि जबाबदार समाज घडवणे ही काळाची गरज आहे. सदर कार्यक्रमाचे आभार श्री.अवधूत मालणकर,संस्था अध्यक्ष यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे