न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हिंगोली परभणी मार्गावर अपघातात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू

हिंगोली/ वृत्तसंस्था

हिंगोली-परभणी राज्य मार्गावर मंगळवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास प्रवासी ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातात पाचपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, औंढा येथून परभणीकडे प्रवाशांना घेऊन एक ऑटो रिक्षा जात होती. याच दरम्यान हिंगोली-परभणी राज्य मार्गावर ऑटो रिक्षाची पिकअप वाहनाला जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात ऑटोमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे