न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नांदेड सावंतवाडी दरम्यान रेल्वेच्या चार विशेष फे-या…. मार्गावर अनेक धार्मिक स्थळं

नांदेड/ प्रतिनिधी 

 मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, दक्षिण मध्य रेल्वेने गणेशोत्सवातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड – सावंतवाडी रोड – नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गाजवळ अनेक सुप्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत.

ही गाडी नांदेड – पुणे – कल्याण – रत्नागिरी – सावंतवाडी मार्गावर धावेल.

गाडी क्र. 07659 नांदेड ते सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या

फेऱ्यांच्या तारखा: 12 आणि 15 सप्टेंबर 2026 शनिवार व मंगळवार)

हि गाडी नांदेडवरून रात्री 08:00 वाजता सुटेल आणि प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे 03:30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्र. 07660 सावंतवाडी रोड ते नांदेड विशेष

हि  गाडी  14 आणि 17 सप्टेंबर 2026 सोमवार व गुरुवार रोजी धावेल .सावंतवाडी रोडवरून सकाळी 07:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.

हि गाडी नांदेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.येथे थांबेल.

दरम्यान या मार्गावर सिध्दटेक अष्टविनायक (दौंड), तुळजाभवानी (येडशी,बार्शी), अंबेजोगाई योगेश्वरी, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग (परळी वैद्यनाथ)  हि धार्मिक स्थळं आहेत तर नांदेडहून तीन तासात माहूरगड हे धार्मिक स्थळं आहे. जे देवीचे पुर्ण पिठ रेणूका माता, श्री दत्तात्रेय जन्म स्थळ, माता अनुसया मंदिर या साठी सुप्रसिद्ध आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे