सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कोल्हापूर खंडपीठात दाखल प्रतिज्ञापत्र याबाबत चर्चा
सिंधुदुर्ग /राजू तावडे
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या व ना. मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथे प्रलंबित असलेल्या खटल्यामध्ये प्रशासनाच्या वतीने जे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे त्या प्रतिज्ञापत्राची पोल खोल करण्यासाठी आज सोमवारी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाला सुजाण नागरिकांनी भेट दिली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, रवींद्र ओगले, मनसे सावंतवाडी शहराध्यक्ष राजू कासकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, जितू मोरजकर, रुग्ण कल्याण समितीचे राजू केळुसकर, विज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उप रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एवले यांच्याशी चर्चा करण्यात आली.


