न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

तिरोडा खासेवाडी येथे नवीन लोखंडी साकव करा, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची मागणी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज मंगळवारी सावंतवाडी येथील निर्माण भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती इंगवले यांची भेट घेऊन तिरोडा खासेवाडी येथील लोखंडी साकव दरवर्षी दुरुस्त करावा लागत असल्या मुळे,नवीन साकव प्रस्थावीत करावा अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तिरोडा गावच्या सरपंच प्रियंका सावंत, उपसरपंच संदेश केरकर व नानोस सरपंच साक्षी शेट्ये उपस्थित होत्या.
या साकवाचा उपयोग तिरोडा, नानोस, रेड्डी, शिरोडा येथील ग्रामस्थाना, सातत्याने करावा लागतो आहे. ग्रामस्थ, तसेच विद्यार्थ्यांना शिरोडा हायस्कूलला जाणे, जिल्हा ग्रामीण रुग्णालय, बाजार रहाट, शेती या सर्व बाबतीत हा साकव दैनंदिन गरजेचा आहे. या साकवाचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन बोर्डकडे पाठवले जाईल असे आश्वासन इंगवले यांनी‌ यावेळी दिले. उप अभियंता पाटील यांना या साकवाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रस्थाव सादर करण्यापूर्वी सकवाकडे जाणारी वाट ग्रामपंचायतीनी रेकॉर्ड 23 नंबर ला लावणे गरजेचे आहे. अन्यथा सकवाचा प्रस्थाव सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन कडे पाठवता येणार नाही. याची कल्पना कार्यकारी अभियंता यांनी शिष्ट मंडळास दिली आहे. जिल्हा बांधकाम अभियत्यांनी जी तत्परता व मार्गदर्शन केले त्या बद्दल त्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे