सावंतवाडी शहरात शॉक लागून आजी नातू तर कारीवडेत वायरमन जखमी
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी शहरातील सबनीस वाडा येथे विजेचा शॉक लागून भावना भावे (५२) यांच्या सह नातू गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या दोघांना बांबोळीत उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर कारीवडेत वायरमन प्रज्जवल नाईक हा पोलावर काम करताना शॉक लागून जखमी झाला.


