दिल्लीत नामांकित रेस्टॉरंटला भीषण आग लागून दहा जणांचा होरपळून मृत्यू..२५ गंभीर
नवी दिल्ली/
दिल्लीतील गजबजलेल्या आणि प्रसिद्ध मालवीय नगर भागातील एका रेस्टॉरंटला आज भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी आहेत. या आगीमुळे रेस्टॉरंटमधून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत असून, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील दुकाने आणि इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.”


