सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी कॅथॉलिक अर्बन सोसायटी कडून २५००० रु. देणगी.
सिंधुदुर्ग |राजू तावडे
कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडीच्या चेअरमन श्रीमती आनमारी डिसोजा, व्हा. चेअरमन पिटर दिमा, सेक्रेटरी श्री मार्टिन आल्मेडा, जनरल मॅनेजर श्री.जेम्स बोर्जिस यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान 25 हजार रुपयांचा धनादेश दिला. तर एका स्वामी भक्ताने या सेवाभावी कार्याला 25 हजार रुपये दिले. संस्थेच्या वतीने या दात्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व रवी जाधव यांच्याकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था आहे. “सामाजिक कार्याचा निर्धार, जनसमान्यांचा आधार” हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. याच ब्रीदवाक्य नुसार ते प्रत्येकाच्या संकटाला धावून जाऊन त्यांना मदत करतात. संस्थेने रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका घेण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला दात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अवघ्या दहा दिवसातच ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे व उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी सांगितले.


