लडाखमध्ये भीषण हिमस्खलन; 7 जणांचा मृत्यू, 5 जखमी; महामार्ग बंद
लेह|
लडाखमधील जोजिला भागात श्रीनगर-लेह मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. महामार्गावर झालेल्या भीषण हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनाचा फटका अनेक वाहनांना बसला. अनेक वाहनं कमी-अधिक प्रमाणात बर्फात अडकली. हिमस्खलनामुळे महामार्ग बंद झाला. शुक्रवारी दुपारी झालेल्या हिमस्खलनानंतर किमान १५ वाहनं बर्फाखाली दबल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर प्रशासनानं एक बचाव अभियान हाती घेतलं. यामध्ये पोलीस, लष्कर, सीमा रस्ते संघटना, एसडीआरएफ आणि सोनमर्ग, द्रासचं जिल्हा प्रशासन सहभागी झालं. रस्ता मोकळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


