न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

देवगड विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्प विरोधी मोर्चाला मनसेचा पाठिंबा, जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

     सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर प्रस्तावित असलेल्या व पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनात व दिनांक ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनसेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या प्रकल्पाला मनसे आपला तीव्र विरोध दर्शविणार आहेत. मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष शिरीष सावंत व संदीप दळवी यांच्या सूचनेनुसार या पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या प्रकल्प विरोधी आंदोलनाला मनसेने पूर्ण पाठिंबा असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी जाहीर केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प येणार नसल्याची भाषा करतात तर खासदार महोदय या प्रकल्पांना कोण विरोध करतो तेच मी बघतो अशी धमकीची भाषा वापरतात. त्यामुळे तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो असले दुपट्टी धोरण सत्ताधारी राबवत आहेत. त्यामुळे यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असण्याची शंका जिल्हवासियाना येत आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी रत्नागिरी येथील जाहिर सभेत पर्यावरण या एका विषयावर कोकण किनारपट्टी संपूर्ण राज्याच अर्थकारण सुधारू शकते असे वक्तव्य केले होते. पण राजकारण्यांची पर्यावरण पूरक प्रकल्प कोकणात यावेत अशी मानसिकताच दिसून येत नाही. त्यामुळे कोठे मायनिंग प्रकल्प तर कोठे औष्णिक ऊर्जा प्रकल्प असे कोकणवासीयांना नको असलेले व समृद्ध कोकणचा विनाश करणारे प्रकल्पच माथी मारले जात आहेत अशी टीका ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे