प्रथमच साजरा होणार जालन्यात संत मुक्ताईचा रिंगण सोहळा…
जालना/ वृत्तसंस्था
जालना शहरात पहिल्यांदाच श्री संत मुक्ताईंचा रिंगण सोहळा पार पडणार आहे.5 जुलैला जालन्यातील जे. ई .एस महाविद्यालयाच्या मैदानावर श्री संत मुक्ताईंचा रिंगण सोहळा होणार आहे. या रिंगण सोहळ्याची जालनेकरांना उत्सुकता असून रिंगण सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांची बैठक झाली असून रिंगणासाठी जे ई एस महाविद्यालयाचे मैदान निश्चित झाले आहे. 5 जुलै रोजी सकाळी 7ते 9 या वेळेत हा पालखी रिंगण सोहळा होणार असून जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी पाण्यासह इतर सर्व व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, वैद्यकीय सेवा पुरविली जाणार आहे.


