खवळे यांचा सेवाकाळ आदर्श…. जिल्हा न्यायाधीश श्री. एस टी. त्रिपाठी
सिंधुदुर्ग / राजू ताव
डे
दिनेश खवळे यांनी वाहनचालक म्हणून आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात प्रामाणिकपणा, समयसूचकता आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा जिल्हा न्यायाधीश १ श्री. एस. टी. त्रिपाठी यांनी दिल्या.
जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग येथे वाहनचालक पदावर अठ्ठावीस वर्षे निष्ठा, सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले व जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक व माजी उपाध्यक्ष असलेल्या श्री. दिनेश परशुराम खवळे यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजन नुकतेच सिंधुदुर्ग नगरी येथे करण्यात आले होते. यावेळी श्री. त्रिपाठी साहेब बोलत होते.
जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित निरोप समारंभास जिल्हा न्यायाधीश १ श्री. एस.टी. त्रिपाठीसाहेब, मे.जिल्हा न्यायाधीश (तदर्थ) श्री. इंदलकर साहेब, मे.दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती कांशीडे मॅडम, मे. सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर-१) श्री. नडदगल्ली साहेब, मे. सह दिवाणी न्यायाधीश-२ श्रीमती पाटील साहेब तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. देशिंगकर यांच्यासह न्यायालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. खवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून श्री. खवळे हे सेवाभावी वृत्तीचे, शिस्तप्रिय स्वभावाचे, प्रामाणिक आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या व्यक्तिमत्त्व आहे अशा भावना व्यक्त केल्या.
याच प्रसंगी श्री. खवळे यांच्या कन्या कु. परी हिने आपल्या वडिलांविषयी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान सायंकाळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे श्री. खवळे यांचा मित्रपरिवार, नातेवाईक व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. वेळी श्री. संजय आटले, श्री. राजू तावडे, श्री. दशरथ गावडे, श्री. राजन ठाकूर, श्री. प्रकाश आडणेकर, श्री. पद्मनाभ परब, श्री. आनंद परब, श्री. संजय लाड, निवासी संकुल मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश चव्हाण, श्री. गुरू कोयंडे , श्री प्रसाद मराठे आदी मान्यवरांनी श्री. खवळे यांच्या प्रदीर्घ सेवेला उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्री. खवळे यांचे बंधू अण्णा खवळे यांनी दिनेशच्या बालपणीच्या अनेक संस्मरणीय आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी दिनेश खवले व त्यांच्या पत्नी सौ. दीप्ती यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या समारंभास जिल्हा न्यायालयाचे माजी प्रबंधक श्री. खान, उच्च श्रेणी लघुलेखक श्री. संजय आठले, माजी अधीक्षक श्री. लिंग्रस, ज्येष्ठ पत्रकार व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेचे माजी संचालक श्री. तावडे, माजी अधीक्षक व तज्ञ संचालक श्री. वाडीकर, राजेश चव्हाण, चेअरमन कृष्णा आडणेकर, विद्यमान अधीक्षक महेश माणगावकर, रोटरी क्लब सदस्य उल्हास पालव, माजी उपनिरीक्षक गुरु कोयंडे, बंदर निरीक्षक रघुनाथ कोयंडे , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी सौ, समृद्धी कोयंडे, कणकवली न्यायालयाचे सहायक अधीक्षक श्री. शीतल सबनीस, मंगेश गावडे, सुनील राठिवडेकर, पार्सेकर, शिवाजी पालव, बाळू कानडे, अशोक रणदिवे, चेतन नेरुरकर, रावजी परब, महेश भटकर, शैलेश जाधव तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नागेश नेमळेकर यांनी केले.


