न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय दर्जा करणार: भाजपा युवा नेते विशाल परब 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

“आंबोली हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्सून मॅरेथॉन आयोजित करणारे महत्त्वाचे क्रीडा पर्यटनस्थळ म्हणूनही आंबोलीची ओळख निर्माण झाली पाहिजे. पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी दिले. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम, आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या आयोजनातून आणि विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वातून रविवारी आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ स्पर्धेचे उद्घाटन श्री. परब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून आंबोलीची ओळख आहे.आता याच आंबोलीच्या हिरव्यागार कुशीतून ‘मान्सून मॅरेथॉन’ची नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, आंबोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक सावित्री पालेकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिनेश गावडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि आंबोली पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणच्या मातीत गुणवत्ता आहे, धावपटूंमध्ये जिद्द आहे, मेहनतीची तयारी आहे; मात्र अनेकदा या गुणांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. याच सुप्त क्षमतेला दिशा देण्यासाठी आणि कोकणातील ‘हिडन टॅलेंट’ जगासमोर आणण्यासाठी विशाल परब यांच्या संकल्पनेतून आंबोली मान्सून मॅरेथॉनचा उपक्रम राबविण्यात आला.

महिला सक्षमीकरण आणि सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने यंदाच्या स्पर्धेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका परब म्हणाल्या की, “यंदाच्या स्पर्धेत महिलांची संख्या लक्षणीय आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. राष्ट्रपती सौ. द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेत अनेक रणरागिणी आज विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत.” असे त्या म्हणाल्या.

कोकणातील धावपटूंना स्पर्धात्मक वातावरण मिळावे, त्यांच्या गुणवत्तेला ओळख मिळावी, नव्या पिढीला धावण्याची प्रेरणा मिळावी आणि या मातीतून भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू घडावेत, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे